ताज्या बातम्या

निवडणूक आयोगाच्या निर्देशनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 111 पोलिसांच्या तातडीने बदल्या

निवडणूक आयोगाच्या निर्देशनानंतर राज्य सरकारने तब्बल 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

Published by : shweta walge

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश होते. आता राज्य सरकारने या सूचनेचे पालन करत तब्बल 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

३१ जुलैला दिलेल्या आदेशाचा अनुपालन अहवाल २० ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश होते. तरी देखील बदल्या करण्यात आल्या नव्हत्या. मुंबईतील १३० पोलीस अधिकाऱ्यांची मध्यावधीत बदली करण्यास गृह खात्याने असमर्थता दर्शवली होती. मध्यावधी बदलीचा पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता गृह खात्याने वर्तवली होती. मात्र वेळेत बदल्या न केल्याने निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालकांची कानउघाडणी केली होती. राज्याच्या मुख्य सचिवांसह पोलीस महासंचालकांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 111 पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक अशा पोलिसांचा समावेश आहे. यापैकी 11 पोलीस निरीक्षकांची बदली मुंबईत करण्यात आली आहे. तर मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या मुंबईबाहेर करण्यात आल्या आहेत. यापैकी सर्वाधिक अधिकाऱ्यांची ठाणे जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे

प्रवीण दत्ताराम राणे, रवींद्र परमेश्‍वर अडाणे, बळवंत व्यकंट देशमुख, निलेश सिताराम बागुल, संजय सदाशिव मराठे, सुनील दत्ताराम जाधव, रुता शंशाक नेमलेकर, हर्षवर्धन यशवंतराव गुंड, हेमंत सहदेव गुरव, मनिषा अजीत शिर्के, इरफान इब्राहिम शेख, संध्याराणी शिवाजीराव भोसले, मथुरा नितीनकुमार पाटील, उषा अशोक बाबर, गणेश बाळासाहेब पवार, जगदीश पांडुरंग देशमुख, जयवंत श्याम शिंदे.

राजीव शिवाजीराव चव्हाण, राजेश रामचंद्र शिंदे, संतोष जगन्नाथ माने, अनधा अशोक सातवसे, संजय थानसिंग चव्हाण, तानाजी सहदेव खाडे यांची मुंबई लोहमार्ग पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. तर प्रमोद तावडे यांची मिरा – भाईंदर – वसई – विरार आणि विक्रम साहेबराव बनसोडे, राजेंद्र श्रीमनधर काणे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

बिलाल अहमद अमीरुद्दीन शेख, सचिन शिवाजी शिर्के, जयश्री धनश्याम बागुल – भोपळे, भास्कर दत्तात्रय कदम, विनायक विलास पाटील, विशाल विलास पाटील यांची पिंपरी – चिंचवडमध्ये बदली केली आहे. तर जयश्री जितेंद्र गजभिये, अजय भगवान क्षीरसागर यांची नागरी हक्क संरक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. तसेच मंगेश लक्ष्मण हांडे, अमर नामदेव काळंगे, अब्दुल रौफ गनी शेख, राणी लक्ष्मण पुरी, अश्‍विनी बबन ननावरे, राहुल विरसिंग गौड, राजेंद्र भाऊराव पन्हाळे, शशिकांत दादू जगदाळे यांची पुण्यात बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय