Mumbai Metro Extended Timings : मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या; गणेशोत्सवात प्रवाशांना दिलासा Mumbai Metro Extended Timings : मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या; गणेशोत्सवात प्रवाशांना दिलासा
ताज्या बातम्या

Mumbai Metro Extended Timings : मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या; गणेशोत्सवात प्रवाशांना दिलासा

गणेशोत्सवात मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या; प्रवाशांना दिलासा

Published by : Riddhi Vanne

गणेशोत्सवात मुंबईकरांच्या प्रवासातील अडचणी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर-गुंदवली मेट्रो 7 या मार्गिकांवरील सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत रात्री 11 ऐवजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहतील.

या निर्णयामुळे दर्शन, देखावे तसेच विसर्जनासाठी रात्री उशिरा बाहेर पडणाऱ्या नागरिकांना अतिरिक्त सोय होणार आहे.सध्या आठवड्याच्या दिवशी या दोन्ही मार्गिकांवर 305 फेऱ्या चालवल्या जातात. गणेशोत्सवात रोज 12 फेऱ्या वाढवून एकूण 317 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. गर्दीच्या वेळेत दर 5 मिनिटे 50 सेकंदांनी, तर कमी गर्दीच्या वेळेत दर 9 मिनिटे 30 सेकंदांनी गाड्या उपलब्ध होतील.

सुट्टीच्या दिवशीही वाढीव फेऱ्यांचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे. रविवारी आतापर्यंत 217 फेऱ्या चालवल्या जात असल्या, तरी आता त्या वाढून 229 फेऱ्यांवर जाणार आहेत.एमएमआरडीएचा हा निर्णय मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरणार असून उत्सव काळात वाहतुकीची कोंडी टाळण्यास आणि प्रवास सुलभ करण्यास मदत होईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Eknath Shinde: संगमनेरमध्ये शिंदे यांच्या रॅलीत शिवसैनिकांमध्ये गोंधळ; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

Donald Trump : ट्रम्पच्या आदेशानंतर युक्रेनचा रशियावर मध्यरात्री हल्ला; युद्धस्थितीत तणाव शिगेला

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य का दिला जातो; जाणून घ्या...

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला 'एकदंत' का म्हणतात ? जाणून घ्या यामागच्या रोचक कथा