ताज्या बातम्या

बेस्ट बस भाडेवाढीस MMRTAची तातडीने मंजुरी, अंमलबजावणीबाबत मात्र अनिश्चितता

बुधवारी पार पडलेल्या एमएमआरटीएच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली.

Published by : Shamal Sawant

मुंबई महानगर परिवहन प्राधिकरण (एमएमआरटीए) यांच्याकडून बेस्टच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. मात्र, अद्याप अंतिम इतिवृत्तावर सही न झाल्यामुळे या निर्णयाची अधिकृत घोषणा लांबणीवर आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. बुधवारी पार पडलेल्या एमएमआरटीएच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली.

बेस्ट उपक्रमाने साध्या बससाठी 5 किमी अंतराचे भाडे 5 रुपयांवरून 10 रुपये आणि वातानुकूलित (एसी) बससाठी 6 रुपयांवरून 12 रुपये करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. मुंबई महापालिकेची मंजुरी मिळाल्यानंतर तो प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी एमएमआरटीएकडे पाठवण्यात आला होता.

दरम्यान, बेस्टच्या भाडेवाढीसोबतच रिक्षा व टॅक्सी मीटर रिकॅलिब्रेशनसाठी दिलेली 30 एप्रिलची अंतिम मुदत एक महिना वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 63 टक्के वाहनेच रिकॅलिब्रेशन प्रक्रिया पूर्ण करू शकली आहेत. उर्वरित वाहनांवर दंडाची कारवाई होऊ शकते, अशी भीती संघटनांनी व्यक्त केली होती. त्यामुळे बुधवारी झालेल्या बैठकीत ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा