Congress : काँग्रेस देशभरात करणार मनरेगा बचाव आंदोलन. ग्रामीण रोजगारासाठी केलेला मनरेगा कायदा केंद्र सरकारने रद्दबातल केला याचे परिणाम सरकारला भोगायला लागतील. कायदा रद्द केल्याने जनतेत संताप असल्याचे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. तसेच 5 जानेवारीला काँग्रेस देशभरात मनरेगा बचाव आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केले. व्हिबी जी राम जी कायदा केंद्र सरकारने आणला असून मनरेगा कायदा रद्दबातल केला आहे याविरोधात काँग्रेसकडून केंद्र सरकारवर टीकास्त्र डागण्यात येत आहे
थोडक्यात
काँग्रेसचा मनरेगा बचाव आंदोलन: काँग्रेस ५ जानेवारीला देशभरात मनरेगा बचाव आंदोलन करणार.
मनरेगा कायदा रद्द करण्याचा निर्णय: केंद्र सरकारने ग्रामीण रोजगारासाठी केलेला मनरेगा कायदा रद्दबातल केला.
काँग्रेसचा आरोप: काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "कायदा रद्द केल्याने जनतेत संताप आहे."
केंद्र सरकारवर टीका: व्हिबी जी राम जी कायदा आणला होता, त्याच कायदाला केंद्र सरकारने रद्दबातल केले आहे.
काँग्रेसचे टीकास्त्र: मनरेगा कायदा रद्द केल्यावर केंद्र सरकारवर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.