mns avinash jadhav visits dombivli marathi girl stall trader shawarma seller after kdmc action on feriwala 
ताज्या बातम्या

Dombivli Marathi Girl Stall Trader : डोंबिवलीत मराठी माणसांचा व्यवसाय धोक्यात; तरुणीचा हटवला स्टॉल, मनसे आक्रमक

डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एक मराठी तरुणी शॉरमा विक्रीचा व्यवसाय करत असून तिच्यावरच वारंवार कारवाई होत असल्याचा आरोप तिने केला आहे.

Published by : Riddhi Vanne

डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एक मराठी तरुणी शॉरमा विक्रीचा व्यवसाय करत असून तिच्यावरच वारंवार कारवाई होत असल्याचा आरोप तिने केला आहे. इतर फेरीवाल्यांवर मात्र पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे ती म्हणते. या तरुणीने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली. “दररोज 300 रुपये देऊनही माझ्यावर कारवाई झाली,” असा दावा तिने केला. या पोस्टची थेट दखल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली.

यानंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव डोंबिवलीत दाखल झाले. त्यांनी महापालिकेच्या भूमिकेवर संताप व्यक्त करत मराठी तरुणीच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. मनसेचे पदाधिकारी परिसरात पोहोचताच अनेक फेरीवाले पळताना दिसले. मनसेने स्पष्ट केलं आहे की, व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणींवर अन्याय सहन केला जाणार नाही. डोंबिवलीतील या घटनेमुळे पालिकेच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

थोडक्यात

  1. डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत

  2. मराठी तरुणी शॉरमा विक्रीचा व्यवसाय करत असल्याचा प्रकार

  3. पालिकेकडून आपल्यावरच वारंवार कारवाई होत असल्याचा तरुणीचा आरोप

  4. इतर फेरीवाल्यांवर मात्र पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा दावा

  5. “दररोज 300 रुपये देऊनही माझ्यावर कारवाई झाली,” असा गंभीर आरोप

  6. सोशल मीडियावर व्हिडीओ/पोस्टद्वारे तरुणीने आपली व्यथा मांडली

  7. या पोस्टची थेट दखल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा