ताज्या बातम्या

शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

कोरोनाच्या दोन वर्षानंतर दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. कोरोना संकटाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा मात्र, दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कोरोनाच्या दोन वर्षानंतर दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. कोरोना संकटाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा मात्र, दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे. यावर्षी दिवळी सण साजरा करण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. याच पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव साजरा होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. शिवाजी पार्कवर यावर्षीही मोठ्या उत्साहात दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

याचा शुभारंभ आज (21 ऑक्टोबरला) होणार आहे. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित असतात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. दिग्गज नेते मंडळी देखिल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

आज दिवाळीचा पहिला दिवस ‘वसुबारस'

‘वसुबारस; हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. दिवाळीचा सण वसुबारसपासून सुरु होतो. हा सण साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शेती संपत्तीचा आधार असलेल्या गायींचा सन्मान करणे. विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी या दिवशी श्री कृष्णासोबतच गायीची पूजा करतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर