MNS Team Lokshahi
ताज्या बातम्या

वाद थांबेना! जनताच तुम्हाला उलटी करणार, मनसे शहराध्यक्षांचा युवा सेना पदाधिकाऱ्याला टोला

Published by : Sagar Pradhan

अमजद खान। कल्याण: ज्यांची निशाणीसाठी मारामारी चालली आहे. ते आमची निशाणी उलटी करुन दाखवत आहेत. त्यांना जनता लवकर उलटी करणार असा टोला मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी शिंदे गटाचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांना लगावल्यानंतर नवा वाद राजकीय सुरु झाला आहे.

मनसे आमदार राजू पाटील हे विरोधकाची भूमिका पार पडत आहे. विविध प्रश्नावर सत्ताधार्यांना लक्ष करीत आहेत. बॅनरबाजी द्वारे टिका करतात. एमआयडीसीत लावण्यात आलेल्या बॅनरनंतर शिंदे गट आणि मनसेत चांगलीच जुंपली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी जी काही टिका केली. त्याचा शिंदे गटातील युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी प्रतिउत्तर दिले. आत्ता दीपेश म्हात्रे यांनी एक पोस्ट केली. मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर टिका केली.

ही पोस्ट करताना मनसेची निशाणी उलटी लावली. म्हात्रे यांच्या पोस्टनंतर डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत मैदानात आलेले आहेत. त्यांनी दिपेश म्हात्रे यांच्यावर टिका केलली आहे. दीपेश जी तुम्ही सध्या शिंदे गटात आहे. ट्वीटवर बॅक डोअरला उद्धव ठाकरे यांचा फोटो लावला आहे. तुमच्या दोन्ही गटात निशाणीसाठी मारामारी सुरु आहे. त्याचा वाद कोर्टात सुरु आहे. स्वत:ला काय निशाणी मिळते. त्याकडे पहिले लक्ष दिले. आमची निशाणी उलटी करायचा प्रयत्न करु नका. निवडणूका येऊ द्या जतनाच तुम्हाला उलटी करणार असे प्रतिउत्तर दिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य