मीरा-भाईंदरमध्ये आज 8 जुलैला मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार होता. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सकाळी 10 वाजता निघणार होता. मात्र त्यांना मोर्च्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तसेच मनसेच्या मोर्च्यासाठी परवानगी देखील नाकारण्यात आली. त्यावरुन आता मनसे कार्यकर्ते संतापलेले पाहायला मिळत आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याचपार्श्वभूमिवर अनेक नेत्यांनी देखील यावर आपली प्रतिकिया दिली आहे. तर आता मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडल आहे. त्यानंतर ते आंदोलनस्थळी दाखलं झाले असून त्यांनी मोर्च्यावर आपली भूमिका मांडली आहे.
अविनाश जाधव म्हणाले की, "पोलिसांवर प्रचंड दबाव असल्याचं पोलीस म्हणाले. मीरा रोडमध्ये अशा प्रकारचा मोर्चा ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. स्थानिकांना घेऊनच मोर्चा सुरु होता, मात्र ज्या पद्धतीने पोलिसांनी आंदोलक आणि महिलांसोबत वागणूक केली, त्यामुळे बाहेरचे लोकही सहभागी झाले. आमच्या माणसांना घरातून पकडून नेल जात होत. मारलं जात होत, उचलून नेलं जात होत, आम्ही काय दहशतवादी आहोत का? अविनाश जाधवांनी संतप्त होत प्रश्न केला.
पुढे ते म्हणाले, अटक केली नसती तर हा मोर्चा आणखी प्रचंड मोठा झाला असता, मात्र या आंदोलनासाठी मराठी माणूस एकवटला याचा आनंद आहे. मराठी माणसाला कमजोर समजू नका. असा अविनाश जाधवांचा इशारा" तसेच पुढे म्हणाले की, " प्रताप सरनाईकांसोबत झालं ते योग्य नाही, ते मराठी माणूस म्हणून आले होते. मात्र अगोदरच मोर्चा थांबवायचा नव्हता. आशिष शेलार कधी मराठ्यांसाठी रस्त्यावर उतरले का? राजकारणासाठी मराठी हवे. महाराष्ट्रात मराठी माणसाला घाबरवण्याचा दडपवण्याचा प्रयत्न केला, मात्र मराठी माणूस घाबरला नाही. मराठीचा टक्का कमी आहे म्हणणाऱ्यांना हा मोर्चा उत्तर आहे".