नुकतचं दिवाळीनिमित्त ठाकरे कुटुंबीयांचे स्पेशल फोटोसेशन समोर आलं. ठाकरेंची नवी युवा पिढीही एका फ्रेममध्ये दिसून आली. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन झालं. यावेळी उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट दिली.
यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर आज तब्बल 24 वर्षांनी शिवसेना भवनात दाखल झाले होते. शिवसेना भवनात आल्यावर बाळा नांदगावकर भावूक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी शिवसेना भवनाच्या पायरीवर पाया पडत प्रवेश केला.
त्यानंतर त्यांनी शिवसेना भवनाच्या तिसऱ्या मजल्यावरील तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी बाळा नांदगावकर यांच्या जून्या आठवणींना उजाळा मिळाला आणि मनात भावना दाटून आलेल्या पाहायला मिळाल्या.