गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडमोडी घडत आहेत. एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं असून दुसरीकडे पवार कुटुंबातील काका-पुतणेही अनेकदा एकाच मंचावर पाहायला मिळाले आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असतानाच आज, गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेल भेट झाल्याचे समजते. आधी राज ठाकरे हॉटेलमध्ये पोहोचले असून नंतर देवेंद्र फडणवीस हेदेखील हॉटेलमध्ये दाखल झाले. मागील ३० मिनिटांहून अधिक काळ दोघांमध्ये चर्चा सुरू आहे.