मीरा रोडमधील स्वीट्सच्या दुकानदारांना मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर काल व्यापारी संघटनांकडून मीरा भाईंदरमध्ये मनसेच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सगळे व्यापारी रस्त्यावर उतरले. मराठी भाषा बोलण्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यापाऱ्याला मारहाण केली होती. त्याविरोधात व्यापारी संघटना आक्रमक झाली असून त्यांनी कारवाईची मागणी केली. तसेच बंदची हाकही दिली. या मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा ठणकावंल असून व्यापारी आहात इथे फक्त व्यापार करा, असे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल, असेही नमूद केले आहे. त्यांनी आज एक्स पोस्ट करत पुन्हा एकदा गुजराती व्यापाऱ्यांना कडक भाषेत समज दिली आहे.
हेही वाचा