आगामी निवडणुकीसंदर्भात अनेक पक्षांच्या बैठकांचा सिलसिला सुरु झाला असून मनसे नेते राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी सुरु होईल. तसेच या बैठकीत आगामी निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा होणार असून मनसेच्या मुंबई पदाधिकाऱ्यांची या बैठकीत उपस्थिती असणार आहे. दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे युतीबाबत स्पष्टता देतील का? या कडे लक्ष लागलं आहे.