महाराष्ट्रामध्ये सध्या मराठी भाषेचा विषय खूप पेटला आहे. महाराष्ट्रातच परप्रांतीय मराठी बोलण्यावर बंदी घालत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. तसेच या प्रकारांवरून मारहाणीसारखे प्रकारदेखील घडत आहेत. यावरुनच आता राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि मराठी माणसावरुन भाष्य केले आहे.
चहुबाजूंनी महाराष्ट्राला व मराठी माणसाला विळखा पडत आहे. मराठी भाषेला विळखा पडत आहे. मराठी बोलता येत नाही असं मराठी माणसालाच सांगता. पण आता असं चालणार नाही. त्यावेळी तुमच्या कानफाटीतच बसणार. फालतू गोष्टी आम्हाला सांगू नका. उद्यापासून महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यालयात मराठीच बोलली जाणार. प्रत्येक कार्यालयामध्ये मराठी येते की नाही हे तपासा. जर येत नसेल तर कानशिलात मारा".
त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला न्याय मिळणार का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.