हिंदी शिकवण्याच्या सक्तीवरून भाजप-मनसेत बॅनर वॉर पाहायला मिळत आहे. भाजपकडून काल 'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्टाची भक्ती', अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. तर मनसेकडून याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसेने बॅनरवर नमूद केले आहे की, 'हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती आहे.' शिवसेनाभवनासमोर हे दोन्ही बॅनर बाजूबाजूला लावण्यात आले आहे. त्यामुळे आता मनसेच्या प्रत्युत्तरवर भाजप काय प्रतिक्रिया देते, हे पाहणे औस्त्युक्याचे असणार आहे.
राज्यात हिंदी भाषा सक्तीची केल्यानंतर सरकारविरोधात मनसेनं दंड थोपटले आहेत. मनसेनं विविध आस्थापने, संस्थांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही याचा आढावा घेतले. तसेच मनसे आणि भाजप नेत्यांसह विविध पक्षांकडून हिंदी भाषेच्या सक्तीवरून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. आता शाब्दिक चर्चांनंतर बॅनरबाजीतून राजकीय पक्ष आपापली बाजू मांडताना दिसत आहेत.