नवी मुंबई महानगरपालिकेच्या 2026 निवडणुकीत भाजपाने आपली सत्ता कायम ठेवली आहे. भाजपाचे नेता वनमंत्री गणेश नाईक यांनी महापालिकेत आपली प्रभुत्व दाखवली असून, भाजप 74 जागांवर आघाडीवर आहे. एकनाथ शिंदे गटाची शिवसेना 30 जागांवर आघाडीवर आहे, तर ठाकरे गटाचे 2 आणि अपक्ष एक जागेवर आघाडीवर आहेत. यंदाच्या निवडणुकीत मुख्य लढत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात झाली आहे.
नवी मुंबईत एकूण 28 बहुसदस्यीय प्रभाग आहेत, जिथून 111 नगरसेवक निवडून येतात. या निवडणुकीत 27 प्रभागांमध्ये प्रत्येकी 4 नगरसेवक निवडले जातात तर 1 प्रभागातून 3 नगरसेवक निवडले जातील.
वार्ड क्रमांक 2 ची माहिती:
या वार्डमध्ये दिघा गाव, गणेश नगर, आंबेडकर नगर, बिंदु माधव नगर, नामदेव नगर, सजंय गांधी नगर, विष्णू नगर, पंढरी नगर, सुभाष नगर आणि अण्णाभाऊ साठे नगरचा समावेश आहे. या प्रभागाची लोकसंख्या 25,803 असून त्यात अनुसूचित जाती 5,058 आणि अनुसूचित जमाती 481 आहेत.
यंदा प्रभाग क्रमांक 2 चे आरक्षण असे आहे:
2(अ) – अनुसूचित जाती महिला
2(ब) – ओबीसी
2(क) – सामान्य महिला
2(ड) – सामान्य
उमेदवारांची लढत:
2(अ): भाजप – दिपाळी चंद्राम सोनकांबळे, शिवसेना (शिंदे गट) – श्वेता सुभाष काळे, मनसे – सुवर्णा दत्ता कदम
2(ब): भाजप – नविन मोरेश्वर गवते, शिवसेना (शिंदे गट) – विजय लक्ष्मण चौगुले, उबाठा – संजय मोरेश्वर तुरे
2(क): भाजप – अपर्णा नवीन गवते, उबाठा – मीना सजंय पाचारणे
गेल्या निवडणुकीत शुभांगी जगदीश गवते या या वार्डातून विजयी झाल्या होत्या. यंदाही भाजप आपली ताकद कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहे, तर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि मनसे आपले उमेदवारी लढवत आहेत.