MNS Workers Burnt Pakistan Flag in Pune Team Lokshahi
ताज्या बातम्या

तिरंगा, राजमुद्रा अन् हर हर महादेवच्या घोषणा; पुण्यात मनसे आक्रमक...

मनसे कार्यकर्त्यांच्या हातात भारतीय राष्ट्रध्वज, मनसेचा राजमुद्रा असलेला झेंडा होता.

Published by : Vikrant Shinde

चंद्रशेखर भांगे | पुणे: काल पुण्यामध्ये PFI (Popular Front of India) च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर अश्या घोषणा दिल्या. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया आल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एक ट्वीट करून संतप्त प्रतिक्रिया दिली. 'ही कीड समूळ नष्टच करा' असं आवाहन त्यांनी केंद्रीय व राज्याचे गृहमंत्री यांना केलं. त्यानंतर आता मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे.

आज आंदोलन करताना पुण्यात मनसे आक्रमक झाली असून आंदोलन करताना मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या हातात भारतीय राष्ट्रध्वज, मनसेचा राजमुद्रा असलेला झेंडा होता. तर 'हर-हर महादेव' अश्या घोषणाही मनसे कार्यकर्ते देत होते.

राज ठाकरेंचं आवाहन:

राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया:

"एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, 'पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर' अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे."

ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे."

असं आवाहन राज ठाकरेंनी केंद्रीय व राज्याचे गृहमंत्र्यांना केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा