Narendra Modi : नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे मोदींकडून अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन Narendra Modi : नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे मोदींकडून अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन
ताज्या बातम्या

Narendra Modi : नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे मोदींकडून अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन

मोदींचं नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या महिला पंतप्रधान सुशीला कार्की यांचे अभिनंदन केले.

भारत- नेपाळ शेजारील देश नसून मित्र असल्याचे मोदींनी अधौरेखित केले.

नेपाळमध्ये आता शांतता नांदेल अशी आशा व्यक्त केली.

Narendra Modi On Nepal First lady President : भारताचे पंतप्रधान नरंद्र मोदी यांनी नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान सुशीला कार्की यांचे अभिनंदन केले. दरम्यान भारत-नेपाळ देशाला मैत्री असल्याचे अधौरेखित केले.माणिपूरच्या दौऱ्यावेळी इफाळमधील एका सभेत बोलताना मोदींनी सुशीला कार्की यांच्या शपथविधीचा उल्लेख केला आणि नेपाळसोबतच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नात्याला उजाळा देखील दिला.

नेपाळ हा जवळचा मित्र - नरेंद्र मोदी

पंतप्रधान म्हणाले, “आज मणिपूरच्या पवित्र भूमीतून मी नेपाळमधील माझ्या सहकाऱ्यांपर्यंत शुभेच्छा पोहोचवतो. नेपाळ हा केवळ शेजारी नसून नाही, तर भारताचा अतिशय जवळचा मित्र आहे. आपले संबंध केवळ सीमांनी मर्यादित नाहीत, तर ते आपल्या संयुक्त परंपरा आणि श्रद्धांमधून पोसले गेले आहेत.”

नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानाचे अभिनंदन

पंतप्रधान मोदींनी सुशीला कार्की यांचं अभिनंदन करताना म्हटलं, “नेपाळच्या हंगामी पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मी 1.4 अब्ज भारतीय जनतेच्यावतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या नेतृत्वात नेपाळ शांतता, स्थैर्य आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करेल, यावर माझा विश्वास आहे.”

दरम्यान, त्यांच्या पंतप्रधानपदाचा शपथविधी "महिला सशक्तीकरणाचं जिवंत उदाहरण" असल्याचं मोदींनी नमूद केलं. त्यांनी नेपाळमधील लोकशाही मूल्यांचं आणि त्या देशातील जनतेच्या चिकाटीचं कौतुक करत म्हटलं, "अशांत काळातही लोकशाहीची मशाल जपणाऱ्या नेपाळी जनतेला माझा सलाम."

तरुणांच्या भूमिकेचं कौतुक

नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी नेपाळी युवकांच्या पुढाकाराचं विशेष कौतुक केलं. "रस्ते रंगवणं, परिसर स्वच्छ ठेवणं, हे केवळ सौंदर्यवाढीसाठी नव्हे, तर सकारात्मक बदलाचा भाग आहे. नेपाळचा नवा उदय या तरुणांच्या विचारसरणीतूनच घडतो आहे," असं त्यांनी सांगितलं.

राजकीय बदल आणि भारताचा पाठिंबा

केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर सुशीला कार्की यांना कार्यवाह पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या अंतरिम सरकारकडे येत्या ५ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकांची तयारी आणि देशात पुन्हा स्थिरता निर्माण करण्याचं काम सोपवण्यात आलं आहे.

भारत सरकारने या घडामोडींना सकारात्मक प्रतिसाद दिला असून, नेपाळला आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सहकार्याचं आश्वासन दिलं आहे. विशेष म्हणजे, कार्की यांची नेमणूक ही जनतेच्या थेट ऑनलाईन मतदानातून झाली, जिथे जनरल Z पिढीनेही सहभाग घेतला.

मणिपूरमधील अस्थिरतेवरही पंतप्रधानांचे भाष्य

या भाषणात पंतप्रधान मोदींनी मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीवरही प्रकाश टाकला. “राज्यातील सर्व घटकांनी शांततेच्या मार्गाने चालावं. तुमची स्वप्नं आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारत सरकार तुमच्यासोबत आहे,” असं सांगत त्यांनी मणिपूरच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

OBC : मराठा आरक्षणाच्या जीआरवर ओबीसी समाजाचा संताप, नागपुरात महामोर्चाची घोषणा