ताज्या बातम्या

Modi Government Big Decision : मोदी सरकारकडून रेल्वे प्रवाशांना दिवाळी आणि छठनिमित्त गिफ्ट; त्याचसोबत केली आणखी एक महत्त्वाची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेषतः रेल्वे क्षेत्रातील धोरणात्मक निर्णयांनी देशाच्या प्रवासी आणि मालवाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्याची तयारी आहे.

Published by : Prachi Nate

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेषतः रेल्वे क्षेत्रातील धोरणात्मक निर्णयांनी देशाच्या प्रवासी आणि मालवाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्याची तयारी आहे. दिवाळी आणि छठनिमित्त प्रवाशांसाठी 12,000 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय हे फक्त सणवारांची सोय नव्हे, तर रेल्वे सेवा सुधारण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

चार नवीन मार्ग, एक नवा दृष्टिकोन

मंत्रिमंडळाने चार नवीन रेल्वे मार्गांना मंजुरी दिली असून, हे प्रकल्प देशाच्या आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक गरजांशी निगडित आहेत. भुसावळ ते वर्धा, गोंदिया ते डोंगरगड तसेच हावडा-मुंबई कॉरिडॉरवरील तिसरा व चौथा मार्ग यांचा समावेश या प्रकल्पांत आहे. या मार्गांद्वारे केवळ प्रवासी सोयीसुधारित होणार नाहीत, तर मालवाहतुकीची क्षमता आणि जलद गती यामध्येही लक्षणीय वाढ होईल.

उदाहरणार्थ, हावडा-मुंबई कॉरिडॉरवर गोंदिया ते डोंगरगड दरम्यान बांधला जाणारा चौथा मार्ग फक्त 84 किलोमीटरचा आहे, तरी त्यात पूल, बोगदा, उड्डाणपूल व अंडरपास यांचा समावेश आहे. यामुळे वार्षिक 46 दशलक्ष लिटर डिझेलची बचत, 230 शलक्ष किलोग्रॅम CO₂ उत्सर्जन कमी होणे आणि लॉजिस्टिक्स खर्चात 514 कोटी रुपयांची बचत होईल.

तसेच, बडोदा-रतलाम विभागातील 259 किलोमीटरच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गासाठी 8,885 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यात पाच मोठे पूल, 57 पूल, 216 छोटे पूल व दोन रेल्वे उड्डाणपूल यांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे वळणे सरळ होतील, रेल्वे गती वाढेल आणि क्षमता सुधरेल.

पर्यावरण व अर्थव्यवस्थेवर प्रभाव

फक्त प्रवाशांच्या सुविधा नव्हेत तर या प्रकल्पांचा दीर्घकालीन पर्यावरणीय आणि आर्थिक परिणामही महत्त्वाचा आहे. हावडा-मुंबई कॉरिडॉरवरील तिसऱ्या व चौथ्या मार्गामुळे दरवर्षी 90 दशलक्ष लिटर डिझेलची बचत, 450 दशलक्ष किलोग्रॅम CO₂ उत्सर्जन कमी आणि 144 कोटी रुपयांचा लॉजिस्टिक्स खर्च कपात होईल. हे आकडे दर्शवतात की, फक्त वाहतूक सोयी नव्हे, तर देशाच्या ऊर्जा बचतीवर आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही हा प्रकल्प मोलाचा ठरणार आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, “या निर्णयांमुळे रेल्वे प्रवाशांना अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायक सेवा मिळेल. हे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील तसेच देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेतील कार्यक्षमतेत मोठी वाढ घडवून आणतील.”

प्रवाशांसाठी दिवाळी गिफ्ट

या सगळ्याबरोबरच, 12,000 विशेष रेल्वे गाड्या हे मोदी सरकारकडून प्रवाशांसाठी एक ‘दिवाळी व छठनिमित्त गिफ्ट’ ठरणार आहे. सणांच्या काळात प्रवास अधिक सुकर करणे, प्रवाशांच्या सोयीसाठी नियोजन करणे, आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ करणे यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा