ताज्या बातम्या

'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे', मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना 26.1%पसंती'; शिंदेंच्या जाहिरातीने भुवया उंचावल्या

मुख्यमंत्री शिंदेंच्या जाहिरातीनं भुवया उंचावल्या आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री शिंदेंच्या जाहिरातीनं भुवया उंचावल्या आहेत. एकेकाळी देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषणा केली होती. मात्र आता गेले काही दिवस भाजपा आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये जाहिरातबाजी करण्यात आली आहे.

सगळ्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर ही जाहिरात देण्यात आली आहे. या जाहिरातीची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे. या जाहीरातीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना सर्वाधिक पसंतीचा दावा करण्यात आला आहे. 'मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना 26.1%पसंती' देण्यात आली आहे तर फडणवीसांना 23.2% पसंतीचा दावा करण्यात आला आहे.

यासोबतच राज्यातील 49.3% जनतेनं शिंदे-फडणवीसांना पसंती दर्शवल्याचा दावा केला आहे. मतदानासाठी भाजपला 30.2%, शिवसेनेला 16.2% जनतेनं कौल दिल्याचे सांगण्यात आले आहे. तर भाजप-शिवसेना युतीला पुन्हा सत्तेवर आण्यासाठी 46.4% जनता इच्छुक असल्याची माहिती या जाहिरातीतून मिळत आहे. या जाहिरातीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचे आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल

PM Narendra Modi : महाकुंभातील संगम आणि सरयू नदीचे पवित्र पाणी, राम मंदिराची प्रतिकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या या खास भेटवस्तू