ताज्या बातम्या

J. P. Nadda : "दहशतवादाविरोधातील लढ्यासाठी पंतप्रधान मोदींना बळ मिळो", जे. पी. नड्डांचे गणयाराला साकडे

भारतातील जनतेला सुरक्षितता लाभावी आणि परकीय विघातक शक्तींना आळा बसावा, असा संकल्प करत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणरायाला प्रार्थना केली.

Published by : Team Lokshahi

देशातील दहशतवादाचे समूळ उच्चाटन व्हावे, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राहावी, भारतातील जनतेला सुरक्षितता लाभावी आणि परकीय विघातक शक्तींना आळा बसावा, असा संकल्प करत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणरायाला प्रार्थना केली. देशात दहशतवादाविरोधात निर्णायक लढा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिक बळ मिळावे, बुद्धी व सामर्थ्याची प्रेरणा मिळावी यासाठी श्री. नड्डा यांनी श्री गणरायाचरणी विशेष प्रार्थना केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात त्यांचे औपचारिक स्वागत व सन्मान करण्यात आला. या प्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार राजेश पांडे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, तुषार रायकर, सचिन आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहितीही श्री. नड्डा यांना देण्यात आली. श्री गणेशाच्या साक्षीने देशातील प्रत्येक नागरिकासाठी सुरक्षित व शांततेचे वातावरण निर्माण होण्यासाठी नड्डा यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आयोजित रोजगार मेळाव्यात ५१,००० नियुक्ती पत्रांचे वितरण जे पी नड्डा यांच्या हस्ते आज पुण्यात होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा