Mahendra Singh Dhoni Retirementc Mahendra Singh Dhoni Retirement
ताज्या बातम्या

Mahendra Singh Dhoni Retirement : महेंद्रसिंह धोनींचा निरोपाचा सूर? IPLच्या मध्यातच निवृत्तीची शक्यता, चाहत्यांमध्ये खळबळ!

आयपीएल 2026 हंगामाची तयारी सुरू असताना, चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यंदा खेळताना दिसणार असला तरी, तो स्पर्धा अर्ध्यावरच सोडून निवृत्ती जाहीर करू शकतो, असा दावा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने केला आहे.

Published by : Riddhi Vanne

आयपीएल 2026 हंगामाची तयारी सुरू असताना, चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यंदा खेळताना दिसणार असला तरी, तो स्पर्धा अर्ध्यावरच सोडून निवृत्ती जाहीर करू शकतो, असा दावा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने केला आहे.

कैफच्या मते, हा धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम ठरू शकतो. आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये त्याने म्हटलं की, धोनीला संजू सॅमसनला चेन्नई संघात आणण्याची इच्छा आहे. जर ते शक्य झालं, तर तो निर्धास्तपणे संघाच्या नेतृत्त्वातून बाजूला होऊ शकतो.

दरम्यान, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात खेळाडूंच्या अदलाबदलीबाबत चर्चा सुरू आहे. जडेजा आणि सॅम करन यांच्या बदल्यात सॅमसनला घेण्याचा प्रस्ताव असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र हा करार होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.

धोनीने पूर्वी 2022 मध्येही कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे दिले होते, पण त्यावेळी संघाची कामगिरी निराशाजनक ठरल्याने त्याला पुन्हा कमान हाती घ्यावी लागली. त्यामुळे यंदा तो प्रत्यक्ष खेळपट्टीवर निरोप घेईल का, हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा