Akbaruddin Owaisi Team Lokshahi
ताज्या बातम्या

"फक्त 15 मिनिटांसाठी पोलीस हटवा, ओवैसींना..."; मोहित कंबोज आक्रमक

मोहित कंबोज यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : औरंगाबादेत काल एका कार्यक्रमासाठी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) आले होते. त्यांच्या या दौऱ्यामुळे सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. ओवैसी स्कुल ऑफ एक्सलेंस या शाळेच्या भुमिपुजन कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ते खुलताबाद येथील औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवर देखील गेले होते. याठिकाणी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला वंदन करत फूल वाहिली. यावरुन सध्या महाराष्ट्रात राजकारण सुरु आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी याच प्रकरणावरुन आता महाविकास आघाडी सरकारवर (MVA Government) निशाणा साधला आहे. आपली विचारसरणी सोडली असल्याचं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्तीवर येऊन एक कुत्रा औरंगजेबाच्या कबरीवर जातो. जातो तर जातो अन् महाराष्ट्रातील हिंदुंना आव्हान देतो. एरवी हनुमान चालिसा आणि जय श्री राम म्हणणाऱ्यांवरही पोलीस आणि ठाकरे सरकार कारवाई करतं, लोकांना अटक होते. मात्र त्यांच्यावर कुणीही कारवाई करत नाहीये. खुर्चीसाठी तुम्ही विचारसरणी सोडली. भोंग्याचा विषय असेल तर 1000 मशिदींना परवानगी दिल्यावर 20-25 मंदिरांना परवानगी मिळते. ओवैसींवर कारवाई का झाली नाही? पोलीस एवढे लाचार आहेत का? ठाकरे सरकार एवढं लाचार आहे का? जर तुम्ही लाचार असाल तर 15 मिनिटांसाठी पोलीस हटवा, त्यांना हिंदू दोन हात करुन उत्तर देतो असं कंबोज म्हणाले आहेत.

दरम्यान, आता काँग्रेसनेही या वादात उडी घेतली असून, सचिन सावंत यांनी लालकृष्ण अडवाणी यांचा एक फोटो शेअर केला आहे. "औरंगजेबाच्या कबरीवर ओवेसी गेले तर बोंब ठोकून कारवाईची मागणी करणाऱ्या भाजपाने व भाजपाच्या पिट्टूंनी आधी 'जीना'च्या कबरीवर गेलेल्या अडवाणींवर कोणत्या IPC च्या कलमानुसार कारवाई केली? भाजपाचे सहयोगी नितीशकुमारांनाही जेलमध्ये का टाकले नाही? यांचे उत्तर द्यावे.अजून देश संविधानाने चालतो" असं मत सचिन सांवत यांनी व्यक्त केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा