Raj Thackeray & Mohit Kamboj Team Lokshahi
ताज्या बातम्या

मोहीत कंबोज यांनी दर्शवला राज ठाकरेंना पाठिंबा

भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भुमिकेचं समर्थन केलं.

Published by : Vikrant Shinde

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यापासून सातत्याने मांडलेल्या हिंदुत्वाच्या भुमिकेमूळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) ही आक्रमक हिंदुत्वाची भुमिकेकडे वळली असल्याचं लक्षात येत आहे. तर, मनसेच्या या भुमिकेवर विविध क्षेत्रांतील विविध लोकांकडून संमिश्र भुमिका समोर आल्या आहेत. महाविकास आघाडीतील (MVA Goverment) नेत्यांकडून राज ठाकरेंच्या भुमिकेवर टीका केली जात आहे तर, भाजपच्या नेत्यांकडून (BJP Leaders) राज ठाकरेंच्या भुमिकेचं स्वागत केलं जात आहे.

राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलेला 3मे चा अल्टीमेटम आज संपत असतानाच राज यांनी परीपत्रक काढून पुन्हा एकदा तीच भुमिका घेतल्याने आता राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे. त्यातच आता भाजप नेते मोहित कंबोज (BJP Leader Mohit Kamboj) यांनी ट्वीट करून आपलं मत व्यक्त केलं आहे.

काय म्हणाले मोहीत कंबोज?

  • माझ्या धर्मासाठी तुरुंगात जावे लागले तर मी तयार आहे!

  • भोंगेच्या बाबतीत माझा पाठिंबा राज ठाकरेंना आहे!

  • अभिमानाने सांगा आम्ही हिंदू आहोत ! आपण एक आहोत! जय श्री राम!

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार