Chitra Wagh Team Lokshahi
ताज्या बातम्या

डाकीण म्हणत महिलेस मारहाण, चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या...

"अन्यथा शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र या फक्त..."; चित्रा वाघ यांनी ट्विट करत व्यक्त केला संताप.

Published by : Sudhir Kakde

नंदुरबार : डाकीण असल्याच्या संशयावरून नंदुरबार जिल्ह्यात एका महिलेला विवस्त्र करून मारहाण (Molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. एवढ्यावरच न थांबता या विकृत घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय. त्यानंतर आता या प्रकरणावर भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करुन या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. डाकीण असल्याच्या संशयावरून नंदुरबार जिल्ह्यात एका महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याचा प्रचंड धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेतील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. अन्यथा शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र या फक्त तोंडाच्या बाता ठरतील असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकशाहीने काल ही घटना समोर आणल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या घटनेची दखल घेतली आहे. तसंच आरोपींच्या शोधासाठी शोधमोहीम देखील सुरु केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : तुमची सत्ता असेल ती विधान भवनात - राज ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश