महाराष्ट्राध्ये लाडकी बहिण योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रूपये थेट त्यांच्या खात्यात पाठवले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक महिलांनी या रजिस्टर केलं आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार १३ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी अर्थसंकल्पात १४०० कोटींची तरतूद केली आहे.
महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिण योजना तुफान लोकप्रिय ठरली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही चोरांनी महिलांच्या नावाची खोटी खाती तयार करून त्यातून पैसे उकळण्यास सुरुवात केल्याच्या काही घटना ही उघडकीस आल्या होत्या. त्याचप्रमाणे छत्तीसगडमध्ये एक घटना उघडकीस आली आहे. जी घटना सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे. कारण एका ठगाने चक्क सिनेस्टार पूर्वीची पॉर्नस्टार सनी लिओनीच्या नावाने पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं काय घडलं?
छत्तीसगड सरकारच्या महतारी वंदन योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून सनी लिओनी हिला पैसे पाठवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. अभिनेत्री सनी लिओनी हिच्या नावानं एकानं ऑनलाईन अकाऊंट उघडलं होतं. महतारी वंदन योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत विवाहीत महिलांना दर महिन्याला 1 हजार रुपये देण्यात येतात. 2024 मध्ये सत्ताधारी भाजपने निवडणूक प्रचारादरम्यान ही घोषणा केली होती. याच योजनेअंतर्गतचे पैसे सनी लिओनीच्या नावावरील अकाऊंटमध्ये कथितरित्या पाठवण्यात येत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
थोडक्यात
छत्तीसगडच्या तालूर गावातील घटना
सनी लिओनीच्या नावाने बनावट बँकेचं खातं
शासनाची फसवणूक
संबंधितांवर प्रशासनाची कारवाई
काय झाली कारवाई?
ही बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी हरिस एस यांनी महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांना ‘महतरी वंदन योजने’च्या तलूर गावातील गैरप्रकारांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच संबंधित व्यक्तीचे बँक खाते जप्त करून वसुलीची कारवाई करण्याचीही सूचना देण्यात आली आहे. इतकंच नाही तर या कामात सहभागी असलेल्या कामगार व व्यक्तीवर एफआयआर नोंदवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. महिला व बालविकास विभागाने संबंधितांवर आवश्यक कारवाई केली.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-