ताज्या बातम्या

पावसाने माणिकगड पहाडातील धबधबे खळाळले; पर्यटक घेतायत निसर्गाचा आनंद

Published by : Siddhi Naringrekar

अनिल ठाकरे, चंद्रपूर

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व पर्वतराजी माणिकगड (Parvatraji Manikgad) पहाडाच्या डोंगरदऱ्यात असलेले धबधबे (Waterfall) मुसळधार पावसाने ओथंबून वाहू लागले आहे. त्यामुळे त्यांचे सौंदर्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी व निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी अनेक हौसी पर्यटक व ट्रेकर्स ची पाऊले या स्थळी वळली आहे.

माणिकगड पहाड (Parvatraji Manikgad)हा तसा निसर्गसौंदर्याची अलौकिक देणच आहे. या परिसरातील कोरपना व जिवती तालुक्याच्या सीमावर्ती भागात अनेक पर्यटन स्थळे आहे. त्यामुळे अनेकांचा ओढा या भागात पावसाळी पर्यटनासाठी वळतो आहे.

कोरपना तालुक्यातील बोदबोदी वगळता इतर ठिकाणच्या धबधब्यावर जाण्यासाठी कुठेच पक्का रस्ता नाही. तरी मात्र दरवर्षी बरेच पर्यटक कुतूहला पोटी या ठिकाणी भेटी देत असतात. आणि तेथील निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य ही त्यांना भुरळ घालते आहे. या ठिकाणी आलेल्या अनेक पर्यटकांना येथील अनुभव हा 'डर के आगे ही जित है ! ' असा वाटतो.

महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ व वनविभागाने रस्ता तसेच पर्यटन विषयक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत पर्यटकांकडून व्यक्त होते. या स्थळाचा पर्यटन दृष्टीने विकास साधल्यास सरकारलाही चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण होईल. व या मागास भागांचा विकासही आपसूकच घडून येईल.

घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे अजूनही बेपत्ता

पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात अजित पवार गैरहजर

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य