या वर्षी पाऊस वेळेआधीच महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. मुंबई, पुण्याला पावसाला झोडपून काढले आहे. मुंबईमधील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच अनेक ठिकाणी इमारतीचे नुकसानदेखील झाले आहे. पण अजून काही काळ हा धुमाकूळ अशीच राहण्याची शक्यता आहे. याआधी मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. पण आता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
फक्त मुंबईच नाही तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पुणे घाट, रायगड, रत्नागिरी, आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.