ताज्या बातम्या

VIDEO : हिमाचलमध्ये पावसाचं थैमान; पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळली चार मजली इमारत

Monsoon : उत्तर भारतामध्ये सध्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.

Published by : Sudhir Kakde

देशात सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यांत अतिमुसळधार पावसामुळे पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहेत. त्यातच उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसानं चांगलंच थैमान घातल्याचं दिसून येतंय. काल अमरनाथच्या पवित्र गुहेजवळ मोठी ढगफुटी झाल्याची घटना ताजीच असताना आता हिमाचल प्रदेशमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशचा असल्याचं एन. आय. या वृत्तसंस्थेकडून सांगण्यात आलं आहे. या व्हिडिओमध्ये चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत असल्याचं पाहायला मिळतंय.

हिमाचल प्रदेशच्या चोपाल गावात ही घटना घडली असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सुचनेनंतर रहिवाशांनी ही इमारत आधीच रिकामी केली होती. त्यामुळे या घटनेत कोणतहीही जिवीत हाणी झाली नाही.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या मधील अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी ढगफुटी (Amarnath Cloudburst) होऊन 15 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ढगफुटी झाल्याची नोंद झाली आहे. "सायंकाळी 5.30 च्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक पाण्याचा मोठा प्रवाह आला. अमरनाथ गुहेच्या वरच्या भागात ढगफुटी झाली. एजन्सींना सतर्क करण्यात आलं आहे. लोकांना 10-15 मिनिटांत बाहेर काढण्यात आलं अशी माहिती आयटीबीपीचे पीआरओ विवेक कुमार पांडे यांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी या घटनेची दखल घेतली असून, "बाबा अमरनाथजींच्या गुहेजवळील ढगफुटीमुळे आलेल्या महापुराबाबत मी एलजी मनोज सिन्हा यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली. एनडीआरएफ, सीआरपीएफ, बीएसएफ आणि स्थानिक प्रशासन बचाव कार्य करत आहेत. लोकांचे जीव वाचवणे ही आमची प्राथमिकता आहे. मी सर्व भक्तांसाठी प्रार्थना करतोय" असं अमित शहा म्हणाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद