ताज्या बातम्या

स्वस्तात हॉलिडे पॅकेज देण्याचे आमिष दाखवून पन्नासहून अधिक नागरिकांना ऑनलाईन गंडा

ऑनलाईन फसवणूक केल्या प्रकरणी जुहू पोलिसांनी आरोपीस केली अटक,फसवणुक करून मिळवलेले पैसे आरोपी प्रेमिकेवर उधळायचा

Published by : Sagar Pradhan

रिद्धेश हातिम | मुंबई : मागील काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत आहे मुंबईच्या जुहू पोलिसांनी अशाच एका भामट्यास अटक केली आहे त्याने आत्तापर्यंत किमान 50 हून अधिक नागरिकांना स्वस्तात हॉलिडे पॅकेज आणि रिसॉर्ट बुकिंग उपलब्ध करून देण्याचे आम्ही दाखवून लाखोचा गंडा घातला आहे. हरविंदरसिंग लोहिया उर्फ हैरी असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे तो ऑनलाइन फसवणूक करून कमावलेले पैसे आपल्या प्रेमिकेवर वर उधळत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले.

मिळालेल्या माहितीनुसार विलेपार्ले पश्चिम परिसरात राहणारे फिर्यादी यांची सॉलेटेअर हॉलीडेज नावाची ट्रॅव्हल कंपनी असून २०१९ मध्ये त्यांची ओळख हरविंदरसिंग लोहिया उर्फ हैरी याच्यासोबत झाली होती. आरोपीने फिर्यादी यांना देशभरात कुठेही स्वस्तात हॉलिडे पॅकेज आणि रिसॉर्ट बुकिंग करून देत असल्याचे सांगितले यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी आपल्या क्लाइंट साठी अरविंदर सिंग लोहिया यांच्यामार्फत नाशिक येथील रेन फॉरेस्ट रिसार्ट बुक केले यासाठी त्यांनी अरविंदर सिंग लोहिया यांना गुगल पे च्या माध्यमातून 39 हजार रुपये पाठवले. यानंतर फिर्यादी यांचे क्लाइंट करा नोव्हेंबर 2022 रोजी नाशिक येथील बुकिंग केलेल्या रिसॉर्टवर पोहोचले मात्र तिथे त्यांची बुकिंग झाली नसल्याचे उपस्थित मॅनेजर कडून सांगण्यात आले. ही सर्व हकीगत त्या क्लाइंट कडून फिर्यादी यांना सांगण्यात आली यानंतर फिर्यादीने अरविंदर सिंग लोहिया यांना फोन करून पैसे मागितले मात्र लोहिया यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली म्हणून फिर्यादींनी अरविंदर सिंग लोहिया यांच्या विरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दिली यानंतर जुहू पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान ४०००७९ अधिनियम २००८ अन्वये गुन्हा नोंद करून तपासात सुरुवात केली.

यानंतर झोप पोलिसांनी आरोपीच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पो. नि. मसवेकर, गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी सपोनी.माने, पोह. पाटील, पो. शि.कणसे, तायडे, मोरे आणि पन्हाळे यांचे पथक तयार केले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपीच्या विक्रोळी येथील घरी जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे तो राहत नसल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी नाशिक येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट कडे चौकशी केली असता आरोपी याने दोन वर्षांपूर्वीच येथील नोकरी सोडली आहे आणि त्याने अशी अनेक लोकांची फसवणूक केली असल्याचंही सांगण्यात आलं. यानंतर तपास पथकाने त्याचे कॉल डिटेल्स तपासून अनेकांना फोन करून विचारणा केली असता किमान 50 हून अधिक नागरिकांना अरविंदर सिंग लोहिया याने ऑनलाईन घंटा घातल्याचे निष्पन्न झाले आहे मात्र यापैकी एक गुन्हा जुहू पोलीस ठाण्यात नोंद झाला असून आणखीन पाच ते सहा नागरिकांनी विविध पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दिली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाला आरोपीचे लोकेशन मालाड येथे असल्याचे समजले यानंतर पोलिसांनी सापळा लावून आरोपीस मालाड येथून ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला व ऑनलाईन फसवणूक करून मिळवलेले पैसे तो आपली प्रेयसीवर खर्च करत असल्याचे पोलिसांना सांगितले आरोपी सध्या जुहू पोलिसांच्या ताब्यात असून न्यायालयाने त्याला एक फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टिका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने