ताज्या बातम्या

Stray Dogs : मुंबईत 90000 पेक्षा अधिक Stray Dogs; शेल्टर होम मात्र 8, कसा लागू होणार सुप्रीम कोर्टाचा आदेश?

गेल्या काही दिवसांमध्ये भटक्या कुत्र्यांचा मुद्दा महत्वाचा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांना हटवून शेल्टर होममध्ये पाठवावे असे आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचा आदेश

  • मुंबई शहरात तब्बल ९० हजार भटकी कुत्री

  • मुंबई महानगरपालिकेने दिली माहिती

गेल्या काही दिवसांमध्ये भटक्या कुत्र्यांचा मुद्दा महत्वाचा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांना हटवून शेल्टर होममध्ये पाठवावे असे आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मुंबईमध्ये केवळ ८ शेल्टर होम्स असून, भटक्या कुत्र्यांची संख्या ९० हजारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आदेश कसा पाळायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण करून त्यांना शेल्टर होम्स पाठवावे असा आदेश दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे विधान केल्याचे समोर आले आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळण्यासाठी शहरात अधिक शेल्टर होम्सची आवश्यक भासणार आहे. शिक्षण संस्था, रूग्णालये, बस आणि रेल्वे स्थानक परिसरातील भटक्या कुत्र्यांना तातडीने विशेष निवारा व्यवस्थेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई महानगरपालिकेने ११ वर्षे आधी केलेल्या जनगणानेनुसार, मुंबईत जवळपास ९५ हजारांपेक्षा जास्त भटके कुत्रे आहेत. २०१४ पासून सुरू केल्या गेलेल्या पशु जन्म नियंत्रण (ABC) योजनेनंतर ही संख्या ५ हजारांनी कमी झाली आहे. सध्या शहरात ९० हजारपेक्षा जास्त भटकी कुत्री आहेत. आणि केवळ ८ शेल्टर होम्स असून त्यात ठेवल्या जाणाऱ्या कुत्र्यांची संख्या मर्यादित आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा