mother of all deals india eu latest update big news deal with europe announced tomorrow but will come into effect next year why the delay in giving the us a clean sweep 
ताज्या बातम्या

Big Breaking! भारत-EU मुक्त व्यापार करार अंतिम टप्प्यावर, शिखर परिषदेत होणार अधिकृत घोषणा

भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात बराच काळ चर्चेत असलेला मुक्त व्यापार करार अखेर अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. 26 जानेवारी रोजी नवी दिल्लीत वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी ही आनंदाची बातमी दिली.

Published by : Riddhi Vanne

भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात बराच काळ चर्चेत असलेला मुक्त व्यापार करार अखेर अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. 26 जानेवारी रोजी नवी दिल्लीत वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी ही आनंदाची बातमी दिली. हा करार इतका महत्त्वाचा मानला जातो की दोन्ही बाजूंनी त्याला “सर्वात मोठा करार” असे संबोधले जात आहे.

उद्या होणाऱ्या भारत-EU शिखर परिषदेत या कराराची अधिकृत घोषणा होणार आहे. सध्या करारातील अटींची कायदेशीर तपासणी सुरू असून ती पूर्ण व्हायला काही महिने लागतील. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यावर्षी अखेरीस करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे, तर 2027 पासून तो लागू होऊ शकतो.

या करारामुळे भारत आणि युरोपमधील कोट्यवधी ग्राहकांसाठी व्यापाराच्या नव्या संधी खुल्या होतील. भारतात युरोपमधून गुंतवणूक वाढेल, रोजगारनिर्मितीला चालना मिळेल आणि अर्थव्यवस्थेला बळकटी येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जागतिक स्तरावर बदलत्या व्यापार धोरणांच्या पार्श्वभूमीवर हा करार भारतासाठी रणनीतीच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

थोडक्यात

  1. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार करार बराच काळ चर्चेत होता.

  2. हा करार आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे.

  3. 26 जानेवारी रोजी नवी दिल्लीत ही माहिती देण्यात आली.

  4. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी ही आनंदाची बातमी जाहीर केली.

  5. या कराराला दोन्ही बाजूंनी “सर्वात मोठा करार” असे संबोधले जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा