ताज्या बातम्या

OTT Release This Week : 'ज्वेल थीफ' ते 'लॉगआउट'; 'या' विकेंडला प्रदर्शित झाले 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

एप्रिल महिन्याचा शेवट प्रेक्षकांसाठी चित्रपट आणि वेब सीरिजची पर्वणी घेऊन आला आहे.

Published by : Rashmi Mane

एप्रिल महिन्याचा शेवट प्रेक्षकांसाठी चित्रपट आणि वेब सीरिजची पर्वणी घेऊन आला आहे. यामध्ये अभिनेता सैफ अली खान अभिनीत 'ज्वेल थीफ - द हाइस्ट बिगिन' आणि हॉलीवूड लवेब सीरिज 'यू' या चित्रपटांचा समावेश आहे. मोहनलाल, पृथ्वीराज सुकुमारन आणि अभिमन्यू सिंग यांचा 'एल 2 एम्पुरान' हा चित्रपट 24 एप्रिल रोजी 'जिओ हॉटस्टार'वर प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता तो ओटीटीवर दिसणार आहे.

काली, एक सामान्य दुकानदार गुन्ह्यात अडकतो आणि तो स्वतःला कसे सोडवतो. ही त्याची छोटीशी कहाणी आहे. तुम्ही अमेझॉन प्राइमवरून 'वीरा धीरा सूरन' भाग 2 डाउनलोड करू शकता. नेटफ्लिक्सच्या बहुप्रतिक्षित वेब सिरीज 'यू' चा शेवटचा आणि पाचवा सीझन प्रदर्शित झाला आहे.

सैफ अली खान आणि जयदीप अहलावत यांचा 'ज्वेल थीफ : द हेइस्ट बिगिन्स' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. ही एका चोराची कहाणी आहे, जो आफ्रिकन रेड डायमंड चोरण्यासाठी संग्रहालयात घुसतो.

'खौफ' ही वेब सिरीज अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली आहे. ही 8 भागांची हॉरर ड्रामा मालिका आहे. यात चुम दरंग आणि रजत कपूर यांच्या भूमिका आहेत.

बाबिल खान आणि रसिका दुग्गल यांचा 'लॉगआउट' हा चित्रपट ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट तुम्हाला डिजिटल जगाची काळी बाजू दाखवतो.

'क्रेझी' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. 28 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने फारसे कलेक्शन केले नाही. सोहम शाहचा हा चित्रपट तुम्ही अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Protest : मराठा आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला कडक इशारा

Latest Marathi News Update live : मनोज जरांगे यांनी पाणी प्यायले

Landslide : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भूस्खलन; 19 कामगार अडकले, बचावकार्य सुरु

Manoj Jarange Protest - “ मराठा आंदोलनाला परवानगी सरकारने दिलीच कशी?” ; हायकोर्टाचा थेट सवाल