ताज्या बातम्या

खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाच्या डीनलाच लावले शौचालय साफ करायला

नांदेडमध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयांमध्ये 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. गंभीर बाब म्हणजे यात नवजात बालकांचाही समावेश आहे

Published by : shweta walge

नांदेडमध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयांमध्ये 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. गंभीर बाब म्हणजे यात नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी आज या रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी नांदेड- रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. हे पाहिल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या डीनला स्वच्छतागृह साफ करायला लावलं आहे. एवढच नाही तर हेमंत पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला खडेबोल सुनावले आहे.

नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील स्वच्छतागृह अतिशय घाणेरड्या स्थितीत होते. अनेक शौचालय हे ब्लॉक होते. काही ठिकाणी तर स्वच्छतागृहात देखील नव्हते, असे खासदार हेमंत पाटील म्हणाले. रुग्णालयात सर्व अनागोंदी कारभार सुरू असून दोषींवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रुग्णालयातील असुविधा पाहून हेमंत पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला खडे बोल सुनावले.रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाहीय.अशातच औषधाचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णालयात मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. रुग्णालय प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर डॉकटरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केलीय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Rain Alert : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

Mahua Moitra On Amit Shah : "अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे"; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त वक्त्तव्य

BCCI India vs Pakistan : "तर मी पाकिस्तानविरुद्ध खेळलो..." पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना व्हावा की नाही? माजी भारतीय खेळाडूच्या मताने वेधल लक्ष

Manoj Jarange Patil : मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, जरांगेंनी ठणकावलं