Rajeev Rai Challenges Raj Thackeray Over Marathi Language Row : सध्या मराठी भाषावरुन होणारा वाद चांगलाच तापला आहे. दादरच्या वरळीमध्ये ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा झाला. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी झालेल्या या मेळाव्याने 18 वर्षांपासून दुरावलेल्या दोन्ही भावांना एकत्र केले. हा विजयी मेळाव्याचा सुवर्ण क्षण पाहण्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मराठी कार्यकर्ते वरळी डोममध्ये दाखल झाले होते. मात्र 5 जुलैला झालेल्या मेळाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ पाहायला मिळत आहे. मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये बोललीच गेली पाहिजे या राज ठाकरे यांच्या भूमिकेला आता पुर्णियाचे खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी चॅलेंज दिले होते. त्यानंतर आता आणखीन एकदा खासदारने एक्स अंकाऊटवर पोस्ट टाकत मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान दिले आहे.
समाजवादी समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर “गरीब हिंदी भाषिकांवर दादागिरी करत असल्याचा” आरोप करत त्यांच्या राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
राजीव राय यांनी एक्स पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?
प्रिय राज ठाकरे!
तुम्ही कधी विचारले आहे का की तुम्ही महाराष्ट्रात अजूनही राजकीय ताकद का निर्माण केली नाही?. जेव्हा कोणी विचारत नाही, तेव्हा माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी गरीब हिंदी भाषिक लोकांवर गुंडगिरी करणे हे तुमच्या भित्रेपणाचे लक्षण आहे. ज्या हिंदी चित्रपटांनी तुमच्या कुटुंबाला अब्जावधी कमाई केली आहे, ज्या हिंदी चित्रपटाने बॉलिवूडची ओळख निर्माण केली आहे, त्यांच्याविरुद्ध तुम्ही कधीही का बोलत नाही? जर तुमच्यात हिंमत असेल तर हिंदी चित्रपट उद्योगाला मुंबईतून हाकलून लावा! जर हिंदी भाषिक गरीब लोक त्यांच्या उपजीविकेसाठी महाराष्ट्रात जातात, तर हजारो मराठी कुटुंबे देखील त्यांच्या उदरनिर्वाहासाठी हिंदी चित्रपटांवर अवलंबून असतात.
मराठी भाषा ही मूल्यांची भाषा आहे, गुंडगिरीची नाही. या देशाचा कोणताही भाग केवळ भाषेमुळे कोणाच्याही वडिलांचा असू शकत नाही; या देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या प्रत्येक भागावर अधिकार आहे, ज्याप्रमाणे संपूर्ण देशात प्रत्येक मराठी व्यक्तीला आदर आणि अधिकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त तुमचे नायक नाहीत तर संपूर्ण देशाचे नायक आहेत. लक्षात ठेवा, या देशाची ओळख "पाहुणे देव आहे" या भावनेत आहे, स्वस्त गुंडगिरीत नाही, आणि गुंडगिरीला तोंड देता येते... योग्यरित्या तोंड देता येते! तर, कृपया आत्मपरीक्षण करा 🙏 @RajThackeray
हेही वाचा...