ताज्या बातम्या

Sanjay Shirsat Viral Video : पैशांनी भरलेल्या बॅगेसोबत संजय शिरसाट; 'त्या' Viral Video बाबत स्पष्टचं म्हणाले...

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक धक्कादायक दावा करत सांगितले की, "एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा, पैशांनी भरलेल्या बॅगेसह व्हिडीओ माझ्याकडे आहे."

हा व्हिडीओ एका हॉटेलमध्ये शूट झाल्याचा दावा करण्यात येतो. राऊत यांनी याच अनुषंगाने शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की, त्यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे आहेत आणि भविष्यात कारवाई अटळ आहे.

दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "हा व्हिडीओ फार जुना आहे. त्याला काहीही अर्थ नाही. मी प्रवासानंतर थकून माझ्या घरातील बेडरूममध्ये बसलो होतो, तेव्हा कुणीतरी हा व्हिडीओ शूट केला. यात पैशांची कोणतीही बॅग नव्हती. त्यातून चुकीचे चित्र रंगवले जात आहे."

शिरसाट यांनी पुढे स्पष्ट केले की, "पैशांनी भरलेल्या बॅगेसंदर्भात मला कोणतीही माहिती नाही. याचा तपास करणे हे संबंधित यंत्रणांचे काम आहे. फुकटचे वाद निर्माण करण्यात काहींचा हात आहे."

याच दरम्यान, आयकर विभागाने संजय शिरसाट यांना नुकतीच एक नोटीस बजावली आहे. हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील ‘व्हिट्स हॉटेल’च्या लिलावाशी संबंधित असल्याचे समजते. लिलाव प्रक्रियेमध्ये काही अनियमितता झाल्याचा संशय असल्याने ही नोटीस देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

या घडामोडीमुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली असून, या प्रकरणामुळे राजकीय तापमान पुन्हा एकदा चढताना दिसत आहे.

हेही वाचा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा