Shrikant Shinde vs Rahul Gandhi 
ताज्या बातम्या

संसदेत खासदार श्रीकांत शिंदे कडाडले; राहुल गांधींवर निशाणा साधत म्हणाले, "काँग्रेसनं एकटं लढावं किंवा..."

सत्तापक्षाचे लोक हिंदू नाहीत. भाजप हिंसा पसरवण्याचं काम करत आहे. राहुल गांधींच्या अशा वक्तव्यानं संसदेत गदारोळ झाला होता.

Published by : Naresh Shende

Shrikant Shinde Parliament Speech : सत्तापक्षाचे लोक हिंदू नाहीत. भाजप हिंसा पसरवण्याचं काम करत आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यानं संसदेत गदारोळ झाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. तसच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केलीय. शिंदे म्हणाले, शिवसेना एनडीएचा जुना साथीदार आहे. जसंत एलआयसीचं एक वाक्य आहे, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. बाळासाहेबांच्या आधीही आणि त्यांच्या जाण्यानंतरही शिवसेना एनडीएसोबत आहे. जनतेनं एक मेसेज दिला आहे. काँग्रेसनं एकटं लढावं किंवा इंडिया आघाडी बनवून त्यांना विरोधी पक्षातच बसावं लागणार आहे.

श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, काँग्रेसला असं वाटतंय ते विरोधी पक्षात नाही, तर सत्तेत बसले आहेत. दहा वर्षात काँग्रेस ४४ वरून ९९ वर पोहोचली आहे. १०० चा आकडाही त्यांना पूर्ण करता आला नाही. आम्ही १५ जागा लढलो आणि ७ जिंकलो. तुम्ही २८५ जागांवर निवडूक लढली आणि फक्त ९९ जागा जिंकले. म्हणजे तुमचा स्ट्राईक रेट फक्त ३४ टक्के आहे.

२८५ मध्ये ५१ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. आंध्रप्रदेश, हिमाचल, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली आणि त्रिपुरात काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही. तुमचे आकडे कमी आहेत. पण तुमची आकड वाढली आहे. मला वाटतं की, पराभवाच्या सत्यतेवर काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. लोकांनी मोदींच्या नितीवर विश्वास ठेवला आहे. म्हणून आम्ही तिसऱ्यांदा सत्तेत बसलो आहोत, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रात सर्वात मोठा वारकरी सांप्रदयाचा सोहळा सुरु आहे. लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात आणि तिथे पांडुरंगाचं दर्शन घेतात. या १८ व्या लोकसभेचं पहिलं भाषण मी पांडुरंगाच्या जयघोषाणे सुरु करत आहे, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या इतर खासदारांनी संसदेत विठ्ठल नामाचा गजर केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?