छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त ग्रँड सेलिब्रेशन झाले. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या संख्येने त्यांचा चाहता वर्ग शुभेच्छा देण्यासाठी आलेला पाहायला मिळाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील स्वतः या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली.
त्याचसोबत प्रीतम कळसकर मित्र समूहाचा आठ फुटी केक खासदार उदयनराजे भोसले यांनी कापून केला वाढदिवस साजरा. छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवसानिमित्त त्यांच्या जलमंदिर पॅलेस येथे पुण्यातल्या शिवाजीनगर येथून आलेल्या रामभाऊ देवकर मित्र परिवाराच्या वतीने चांदी आणि सोन्याचे सिंहासन भेट देण्यात आले. यावेळी पुण्याहून जलमंदिर पॅलेस या ठिकाणी मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. पवई नाक्यावरील फटाक्यांची आतषबाजी डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.