महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या संयुक्त परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्षांची शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसेच गट-क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या उमदेवारांना याचा फायदा होणार आहे.
गट ब परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी तर गट क परीक्षा ही 4 मे रोजी घेण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत आपले महायुती सरकार! कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत शासन निर्णय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमार्यदेत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसेच गट-क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे! असे मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट केलं आहे.