ताज्या बातम्या

राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची भीती, एमएसईबी संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले...

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आजापासून संपावर आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आजापासून संपावर आहेत. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. मध्यरात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत.महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवस हा संप सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे. काल मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या पुकारलेल्या संपात नाशिक परिमंडळातील साडे तीन हजार कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा दिला असून नाशिककरांसाठी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे (MSEB) संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले आहे की, “राज्यातील जनतेने कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नाही. वीज कर्मचारी त्यांच्या संपाविषयीची भूमिका बदलतील याची खात्री आहे. अन्यथा पर्यायी व्यवस्था झाली असल्याने विद्युत पुरवठा अखंडित राहील याची खात्री बाळगावी.” असे ते म्हणाले.

हा संप असाच चालू राहिला तर याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रमाणात होणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील 13 हजार कर्मचाऱ्यांचा संपात समावेश आहे. तर रायगडमध्ये 1 हजार 500 कर्मचारी संपात सहभागी. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यातच संप करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकराने आता नोटीस बजावली आहे. संपात सहभागी होणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करण्याच्या इशारा सरकारने दिला आहे. दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा