MSRTC Employee Bonas News : एसटी कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी आनंददायक ठरणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला 6,000 रुपयांची दिवाळी भेट (सानुग्रह अनुदान) आणि 12,500 रुपयांची सण उचल जाहीर केली आहे.
राज्यभरातील 85 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. तसेच 2018 पासून प्रलंबित वेतनवाढीचा सरासरी फरक प्रतिमाह 7,500 रुपये देण्यासही मंजुरी देण्यात आली असून, यासाठी शासन एसटी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे.
याआधी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी 16 संघटनांनी 13 ऑक्टोबरपासून चक्काजाम आंदोलन जाहीर केले होते. मात्र उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
मुख्य मागण्या होत्या:
महागाई भत्ता फरक (2018 पासून)
वेतनवाढ फरक (2020-2024 )
थकीत रक्कम (एकूण 4000 कोटींपेक्षा अधिक)