ST Employees strike Team Lokshahi
ताज्या बातम्या

ST Strike : हिंगोलीत आणखी एका कर्मचाऱ्याची आत्महत्या

मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

Published by : Sudhir Kakde

हिंगोली : एसटी कर्मचार्यांनी शरद पवार यांच्या घरावर हल्लाबोल केल्याने राज्यभरात एसटी कर्मचार्याविरुद्ध वातावरण तापलं असतांना हिंगोली जिल्ह्यात एका वाहकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशोक दगडू कळंबे अस या मयत वाहकाच नाव असून ते वसमत आगाराचे कर्मचारी होते.

मागील पाच महिन्यांपासून अशोक कळंबे हे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होते. ते वसमत शहरात कुटुंबियांसह भाड्याच्या घरात राहत होते. सोमवारी सायंकाळी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली याबाबत मात्र अद्याप माहिती पुढे येऊ शकली नाही.

दरम्यान, सदर वाहकाला वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा