(Kokilaben Ambani) रिलायन्स समूहाचे संस्थापक स्वर्गीय धीरुभाई अंबानी यांच्या पत्नी आणि उद्योगपती मुकेश अंबानी व अनिल अंबानी यांच्या मातोश्री कोकिलाबेन अंबानी यांना प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर एच.एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कोकिलाबेन अंबानी वयाच्या ९१ व्या वर्षी आरोग्याशी संबंधित विविध समस्यांना सामोरं जात आहेत. मात्र, त्यांची तब्येत अचानक खालावल्याने रविवारी रात्री त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणतानाचे दृश्य दिसत आहेत. रिलायन्स समूह किंवा अंबानी कुटुंबीयांकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.