थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mukesh Ambani) मुकेश अंबानींच्या रिलायन्सची सीबीआय चौकशी होणार आहे. जितेंद्र पी मारू यांनी ही याचिका दाखल केली होती, ज्यांनी न्यायालयाला विनंती केली होती की केंद्रीय अन्वेषण विभागाला आरआयएल आणि त्यांच्या संचालकांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन च्या विहिरींमधून 1.55 अब्ज डॉलर्स किमतीच्या नैसर्गिक गॅस चोरीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ही नोटीस बजावली असून नैसर्गिक गॅस चोरीच्या आरोपांची चौकशी होणार आहे.