Admin
Admin
ताज्या बातम्या

उद्योजक मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना देश-विदेशात Z+ दर्जाची सुरक्षा द्या - सर्वोच्च न्यायालय

Published by : Siddhi Naringrekar

उद्योजक मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना देश-विदेशात Z+ दर्जाची सुरक्षा द्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिले आहेत. 22 जुलै 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने उद्योजक मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याची परवानगी दिली होती. त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या त्रिपुरा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता.

22 जुलै 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने उद्योजक मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याची परवानगी दिली होती. त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या त्रिपुरा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. उद्योगपती मुकेश अंबानी यांना असणारा धोका पाहता त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली होती. तर त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना Y+ सुरक्षा देण्यात आली होती.

मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी केंद्रीय गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारला गेल्या वर्षीच न्यायालयाला सादर केला होता. त्यामुळे आता देशात आणि भारताबाहेरही Z+ सुरक्षा देण्यात आली आहे. सुरक्षेचा सर्व खर्च अंबानी कुटुंबीय करणार आहेत.

"देशातील वाढत्या महागाईला नरेंद्र मोदीच जबाबदार", मविआच्या सभेत शरद पवारांचा महायुतीवर घणाघात

"नरेंद्र मोदींचं काम पाहून राज ठाकरेंनी..."; शिवतीर्थावर ठाकरेंची भेट घेतल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

"...तर सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा खासदार बनू शकतो"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेश म्हस्केंचं मोठं विधान

IPL 2024 : आरसीबी आणि मुंबई इंडियन्सला अजूनही प्ले ऑफमध्ये खेळण्याची संधी, 'असं' आहे समीकरण

"नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न केला, तर..."; संजय राऊतांनी दिला इशारा