Eknath Shinde Lokshahi
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde: "लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी...हा मुख्यमंत्री भावाचा शब्द"; सिल्लोडमध्ये शिंदेंची मोठी घोषणा

"शैक्षणिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात महिलांना सक्षम करायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिन्याला दीड हजार, वर्षाला १८ हजार रुपये तुम्हाला खात्यात मिळणार आहेत"

Published by : Naresh Shende

CM Eknath Shinde Speech: आम्ही बोलत नाही, प्रत्यक्ष कृती करतो. विरोधक म्हणतात, ही योजना फक्त निवडणुकीपर्यंत आहे. ही योजना सुरु करण्यासाठी आम्ही एक वर्षापासून याचं नियोजन करत होतो. एक वर्षापूर्वी निवडणुका होत्या का? आम्ही लेक लाडकी एक लाख रुपयांची योजना ९ महिन्यांपूर्वी होती. तेव्हा निवडणुका होत्या का? निवडणुका झाल्यावरही ही योजना सुरु राहिली पाहिजे. ही योजना आम्ही निवडणुकीसाठी आणली नाही. माझ्या बहिणींना आधार देण्यासाठी आणली आहे. ही योजना कायमस्वरुपी सुरु राहणार, हा तुमच्या मुख्यमंत्री भावाचा शब्द आहे. विरोधकांच्या पोटात दुखलंय, त्यांना पराभव दिसू लागला आहे. या योजना सुरु केल्यावर सरकारला श्रेय मिळेल आणि निवडणुकीत त्यांचा पराभव होईल, अशाप्रकारची धास्ती त्यांना लागली आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ते सिल्लोडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलत होते.

एकनाथ शिंदे जनतेला संबोधीत करताना म्हणाले, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात महिलांना सक्षम करायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिन्याला दीड हजार, वर्षाला १८ हजार रुपये तुम्हाला खात्यात मिळणार आहेत. एका घरात दोन बहिणी असतील, तर वर्षाला खात्यात ३६ हजार रुपये जमा करणारं सरकार आहे. ही योजना रक्षाबंधन किंवा भाऊबीजेची नाही. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला सरकारचा आहेर मिळणार आहे. ही योजना कायमस्वरुपी आहे.

हा शब्द तुमच्या भावाचा आहे. तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णयही आपण घेतला आहे. परवा आम्ही या योजनेचा जीआर काढला आहे. मुलीचा जन्म झाल्यापासून १८ वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. कारण मुलींना लखपती करण्याची योजनाही आपल्या सरकारने केली आहे. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेचा एका वर्षात दोन कोटी महिलांना लाभ मिळाला आहे. महिलांचे बचत गट मजबूत करत आहोत, असंही ते म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pakistan News : ओळख विचारुन पंजाबमधील 9 जणांवर झाडल्या गोळ्या ; धक्कादायक प्रकार समोर

Gold Rate : सोन्याच्या दरात 27% वाढ ; गुंतवणूकदारांना लाभ, मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री

Ganpatipule Temple : गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू होणार

Axiom Mission 4 मोहिमेच्या यशस्वी प्रयोगानंतर शुभांशु शुक्ला 14 जुलैला परतणार