Mukyamantri Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, लाभार्थी महिलांना ई-केवायसीमधील चूक सुधारण्यासाठी फक्त एकदाच संधी दिली जाणार आहे. यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे.
Aditi Tatkare on e-KYC : आदिती तटकरे काय म्हणाल्या?
आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले की, ही योजना महिलांना सक्षम करण्यासाठी आहे. त्यामुळे योग्य लाभ मि ळण्यासाठी ई-केवायसीतील त्रुटी सुधारण्याची सुविधा देणे गरजेचे होते. याच कारणामुळे ही अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे.
तसेच ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, अशा लाभार्थींसाठीही खास सोय करण्यात आली आहे. अशा महिलांनी स्वतःची ई-केवायसी ऑनलाइन पूर्ण करायची आहे. त्यानंतर पती किंवा वडिलांच्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रत अंगणवाडी सेविकेकडे जमा करावी लागणार आहे. महिला व बालविकास विभागाचा उद्देश जास्तीत जास्त महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्याचा आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार याकडे अनेक लाडक्या बहिणी लक्ष ठेवून आहेत. ही योजना मागील निवडणुकीत महत्त्वाची ठरली होती, अशीही चर्चा आहे.