Bullet Train Team lokshahi
ताज्या बातम्या

Bullet Train : बुलेट ट्रेनचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार, व्हिडिओ शेअर करत रेल्वेमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

व्हिडिओ शेअर करत रेल्वेमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

Published by : Shubham Tate

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम रात्रंदिवस सुरू आहे. दरम्यान, 1 किलोमीटर अखंड व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे. खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. त्याचा एक व्हिडिओही त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. (mumbai ahmedabad bullet train update 1 kilometer continuous viaduct)

1 किमी अखंड व्हायाडक्ट पूर्ण

बुलेट ट्रेन पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये धावणार होती, परंतु महाराष्ट्रात भूसंपादनाच्या संथ गतीमुळे त्याला विलंब होत आहे. मात्र आता बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ ट्विट केला की, 'एमएएचएसआर (मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर) ने आणखी एक मैलाचा दगड गाठला. मेड इन इंडिया अंतर्गत फुल स्पॅन गर्डर लाँचर्सद्वारे पहिले 1 किमी अखंड व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे.

भूसंपादनाचे ९८.८ टक्के काम पूर्ण झाले

नुकतेच भारतीय रेल्वेने ट्विट केले होते की मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे किती काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ९८.८ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्याचे रेल्वेने सांगितले होते. त्याचबरोबर 162 किलोमीटर लांबीच्या मार्गात पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेने पुढे माहिती दिली की, प्रकल्पाच्या 79.2 किमीपर्यंतच्या घाटाचे कामही पूर्ण झाले आहे.

2017 मध्ये पंतप्रधान मोदींनी पायाभरणी केली होती

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८.१७ किलोमीटरचा आहे. या प्रकल्पाची पायाभरणी 14 सप्टेंबर 2017 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते करण्यात आली होती. हा प्रकल्प 1.10 लाख कोटी रुपयांचा आहे. या रेल्वे मार्गात गुजरातमधील वलसाड, नवसारी, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, खेडा आणि अहमदाबादचा समावेश आहे. या प्रकल्पात 12 रेल्वे स्थानके असतील ज्यात गुजरातमधील 8 आणि महाराष्ट्रातील 4 स्थानकांचा समावेश आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा