air quality index declined 
ताज्या बातम्या

मुंबईतील हवा 'अतिवाईट' तर, उपनगरातील 'मध्यम'

मुंबईतील नेव्ही नगर कुलाबा येथे ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली, तर इतर भागात ‘मध्यम’ हवा नोंदली गेली. नेव्ही नगर कुलाबा येथील हवा निर्देशांक 306 इतका होता.

Published by : Team Lokshahi

थंडीची चाहूल लागताच मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांपासून वारंवार खालावत चालली आहे. मागील काही दिवस मुंबई आणि उपनगरातील काही भागांत हवा वाईट असल्याची नोंद झाली आहे. मात्र, गुरुवारी मुंबईतील नेव्ही नगर कुलाबा येथे ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली, तर इतर भागात ‘मध्यम’ हवा नोंदली गेली. नेव्ही नगर कुलाबा येथील हवा निर्देशांक 306 इतका होता.

पावसाळ्यात हवेचा दर्जा काहीसा सुधारला. मात्र, मोसमी पावसाने मुंबईचा निरोप घेताच पुन्हा एकदा मुंबईच्या हवेत प्रदूषके साचून राहू लागली आहेत. समीर अॅपच्या नोंदीनुसार, गुरुवारी नेव्ही नगर कुलाबा येथील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत होती. नेव्ही नगर कुलाबा येथील हवा गुणवत्ता निर्देशांक गुरुवारी 306 इतका होता. तर, शिवडी येथे 181, भायखळा 199, वांद्रे-कुर्ला संकुल 193, भांडुप 97 तर मालाड येथे 85 इतका हवा निर्देशांक होता.

मागील काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत सातत्याने मध्यम ते वाईट हवेची नोंद झाली होती. मात्र, गुरुवारी उपनगरांतील सर्व भागातील हवा निर्देशांक 100 ते 150 दरम्यान होता. याचबरोबर शहरातील नेव्ही नगर कुलाबा हा परिसर सोडला असता निर्देशांक 150 पर्यंत होता.

हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार, हवेतील पीएम(Particulate matter) 2.5 आणि पीएम 10 या धूलिकणांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. नेव्ही नगर कुलाबा येथे पीएम 2.5 कणांची मात्रा अधिक आहे. पीएम 2.5 हे अधिक घातक असून ते श्वसन यंत्रणेद्वारे शरीरात जातात, त्याचे हवेतील सामान्य प्रमाण हे 35 मायक्रो घनाहून जास्त नसावे. किंबहुना, हे कण पीएम 10 च्या तुलनेत सूक्ष्म असल्याने सहज शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे, ते आरोग्यास घातक ठरतात.

पावसाळ्यानंतर मुंबईतील वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धूलिकण हवेत तरंगत राहतात. या कारणांबरोबरच अनेक मानवनिर्मित कारणेही मुंबईच्या प्रदूषणात भर घालत आहेत. पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुले, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा