बेस्टचा प्रवास महागला असून आता पास देखील महागणार असल्याची माहिती मिळत आहे. बेस्ट बसच्या तिकीटदरात वाढ करण्यास मान्यता मिळाली आहे. बेस्ट उपक्रमाला आर्थिक टंचाईतून बाहेर काढण्यासाठी बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्याच्या निर्णयाला मुंबई महापालिकेने मंजुरी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
वाढीव तिकीट दरवाढीची अंमलबजावणी तात्काळ केली जाणार आहे. बेस्ट बसच्या तिकीट दरवाढीला मुंबई महापालिकेने मंजुरी दिली असून आता साध्या बसचा किमान तिकीट दर पाच रुपयांऐवजी दहा रुपये होणार आहे.
यासोबतच वातानुकूलित बसचा किमान दर सहा रुपयांवरुन बारा रुपये होणार आहे. तर मासिक पासात तब्बल 350 रुपयांची वाढ होणार आहे. वाढत्या महागाईत आता मुंबईकरांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.