ताज्या बातम्या

अंधेरीतील निवासी सोसायटी मधील सेक्स रॅकेट; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईच्या अंधेरीतील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका निवासी सोसायटीमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणी महिला सह कस्टमर वर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आले आहे.

Published by : Team Lokshahi

रिध्देश हातिम, मुंबई

मुंबईच्या अंधेरीतील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका निवासी सोसायटीमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणी महिला सह कस्टमर वर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आले आहे. अटक महिला आरोपीचे नाव रेणू मिश्रा होते जी हे सेक्स रॅकेट चालवायची आणि कस्टमर विनय पाठक यानी 17 वर्षीय अल्पवयीन मुली बरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले यालाही सह आरोपी म्हणून अटक करण्यात आले आहे. दोघांविरुद्ध भादवीसह पिटा आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आले आहे आणि एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला रेस्क्यू करण्यात आले आहे

मिळालेल्या माहितीनुसार एका NGO ने अंधेरीतील एमआयडीसी परिसरात कनक्या एस आर ए बिल्डींग मध्ये वेश्य व्यवसाय सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. माहिती प्राप्त होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने एक पथक तयार करून पीएसआय गायकवाड यांनी कारवाईला सुरुवात केली

पोलिसांनी बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय येथे एका बोगस कस्टमरला पाठवून माहितीची पुष्टी केली आणि तिथे छापा मारला. छापा मारल्यावर पोलिसांना एक महिला नावे रेणू मिश्रा जी सेक्स रॅकेट चालवायची एक कस्टमर विनय पाठक या दोघांना ताब्यात घेतले या कारवाईदरम्यान एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पोलिसांनी रेस्क्यू केले पोलिसांनी या दोघांविरुद्ध भादवीसह पिटा आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दोघांना अटक केले आहे दरम्यान पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate : सोन्याच्या दराने ग्राहकांना दिला झटका; 22 कॅरेट सोनं ‘लाखांच्या’ घरात

Jayant Patil Ganpati Visarjan : जयंत पाटलांच्या घरच्या गणपती बाप्पाचं विसर्जन

Latest Marathi News Update live : अनंत चतुर्दशीनिमित्त पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर आज घरगुती बापांचा विसर्जन संपन्न

Mumbai Police : मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारे जेरबंद, पोलिस चौकशीत धक्कादायक खुलासा